माझी नवीन फॅमिली

by Abha Deshkar
16 views

dedicated to all the “to-be-daughter-in-laws”  🙂

इथे आजी ला म्हणतात आई
आणि मौशी च्या नवर्‍याला बाबा

इतकी सगळी नाती समजायला
मला बराच वेळ लागला….

गेले होते स्वताला एक पाहुणी मे मानून
परत आले कुणाची वाहिनी तर कुणाची नातसून बनून.

हे काय झाला, मला काहीच कळेना
इतक्या लवकर खरच कुणाचा, लागतो का लळा ???

खर सांगते प्रेमात पडताना
                     इतका विचार कधीच केला न्हव्ता
बाय्फ्रेंड पासून नवरा म्हणायला
                      तसा इतका वेळही गेला न्हव्ता…

तरी आज सग्यांसमोर होते उभे घाबरून
घेऊन होते ह्या घरची "होणारी सून" स्वताला म्हणून .

लहानश्या ननंदेने जेव्हा काढल्या हातावर रेखा,
विचार आला….यालाच म्हणतात की काय ते "तक्दीरका लिखा" ?

सकाळ पासून आलेले मी आता वाजले होते सात,
एक एक करून जुळत गेल, नवीन नवीन नात.

घरातून पाय निघेणाशे झाले, आणि एक गोष्ट लक्षात आली…
तुझ्याच बरोबर मला अजुन एक फॅमिली ही मिळाली………..

आभा देशकर
३/१०/२०१०

3 comments

anahita October 7, 2010 - 10:06 AM

very well written abby!!

Reply
Navneet October 7, 2010 - 2:45 PM

u’re just awesome!! and of course I still remember Marathi!! just dint get one sentence:)

Reply
abha deshkar October 8, 2010 - 1:46 PM

hey thanks nonu…which line ???

Reply

Leave a Comment

You may also like