Buy Lamictal Singapore Buy Kamagra Women Viagra Cialis Celerity Online Pharmacy Thyroid Cialis Generique Effet Secondaire
A Rational Mind

नातं

सुदीच्या जोडू कलसी गुडी मंदिरात - चालुक्यांचे मकर तोरण न्याहाळणारा मित्र

सुदीच्या जोडू कलसी गुडी मंदिरात – चालुक्यांचे मकर तोरण न्याहाळणारा मित्र

पावलागणिक उडणारी धूळ-माती,
सांगती मला कोण्या जन्माची नाती?
रेंगाळतो इथे मी, निघत नाही पाय,
या दगडांशी जडले नाते काय?

दूर देश हा, खडकाळ छाती,
फुटकेच बुरुज, तगून उभी जोती!
मायदेशाबाहेरील माझी ही माय,
या दगडांशी जडले नाते काय?

कुठे आडवाटेला भेटे भोळा सांब,
चकाकणारे कुठे संगीतमय खांब!
मंदिरात हरवुनी मन माझे जाय!
या दगडांशी जडले नाते काय?

हिंदुपतीस इथे गाभाऱ्यात पुजती,
नायक औरंग्यास पाणी इथेच पाजती!
पराक्रमाची शर्थ इथेच झाली काय?
या दगडांशी जडले नाते काय?

गडकिल्ले मंदिर राऊळं नवी जरी
ओळखीची वाटती मला ही सारी
हरवुनी इथे मला मीच सापडून जाय
या दगडांशी एकरूप होईन काय?

दक्षिणदेशाची सांगता सांगता कथा,
कळावी जनास पराक्रमाची प्रथा!
आणि मागणे माते तुझपाशी काय?
तुझ्या दगडांशी मी एकरूप होऊनि जाय!

-प्रांजल ©
२४.०८.२०२०

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.