या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!
- Son of Sahyadris
कोयना चांदोली : प्रचितगडाची प्रचिती आणि चांदोलीतील पाठलाग!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 900 views“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता दुसरा वाटाड्या शोधणे आले. आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!
कोयनेच्या जंगलात त्या गव्याने माझ्याकडे पाहत, नाकपुड्यांतून जोरदार हुंकार टाकला!! माझ्या पोटात खोल खड्डा पडला! झालं!संपलं सगळं!
आणि त्या धारेच्या मागे, गूढ अशा अंधारात गुडूप झाली होती एका तपस्वीने, एका लढवय्या सन्याशाने आपल्या अस्तित्वाने पावन आणि चैतन्यमय केलेली एक प्राचीन निसर्गनिर्मित गुहा – रामघळ!
- Son of Sahyadris
कोयना-चांदोली : कुंभार्ली घाटाचा पहारेकरी : जंगली जयगड
by Pranjal Waghby Pranjal Wagh 893 viewsकोयना चांदोली! गोष्ट आहे ११ वर्षांपूर्वीची, सह्याद्रीच्या घनदाट जंगलातल्या पायवाटांवर घडलेल्या आणि आयुष्यभर पुरून उरतील अशा अनुभवांची!
गुमतारा! ३१ मार्चच्या संध्याकाळी संभाजीने व्हॉटसॅपवर एक युट्युबचा व्लॉग टाकला आणि या साऱ्या कामाच्या धामधुमीतून बदल घडावा म्हणून हा ट्रेक करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कोणता होता हा किल्ला?
- GeneralShivaji Maharaj
11 Facts about the Maratha Light Infantry
by Pranjal Waghby Pranjal Wagh 278 views11 lesser known facts about the oldest and one of the most decorated light infantry regiments of the Indian Army
भास्कर राम कोल्हटकरांच्या नेतृत्वखाली जेव्हा मराठी फौजा ओडीशात घुसल्या तेव्हा एका ठिकाणी त्यांना मातीच्या ढिगाऱ्यातून काही मूर्ती डोकावताना दिसल्या. लागोलाग, याची वर्दी भास्कारपंतांना देण्यात आली. त्यांच्या आदेशावरून २०० माणसं तिथे पाठवून ती सारी वाळू, झाडी साफसूफ केल्यावर त्यांना तिथे एक मंदिर सापडले. कोणते होते ते मंदिर?
रात्रभर कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारा थांबायचं नाव काही घेत नव्हत्या. हा परतीचा पाऊस भलताच निष्ठावान निघाला. रात्री १०:१५ वाजता आमच्या बसने बोरीवली सोडल. असंख्य खड्ड्यातून रस्ते शोधत, बेधुंद आणि बेभान ट्रक्स आणि गाड्या चुकवत आमची गाडी जेव्हा कुमशेत गावी पोहोचली तेव्हा सकाळचे ८:३० आणि आमच्या चालकाचे १२ वाजले होते. आणि इतकं होऊन सुद्धा पाऊस काही आमची साथ सोडायचं नाव घेईना!