169
पावलागणिक उडणारी धूळ-माती,
सांगती मला कोण्या जन्माची नाती?
रेंगाळतो इथे मी, निघत नाही पाय,
या दगडांशी जडले नाते काय?
दूर देश हा, खडकाळ छाती,
फुटकेच बुरुज, तगून उभी जोती!
मायदेशाबाहेरील माझी ही माय,
या दगडांशी जडले नाते काय?
कुठे आडवाटेला भेटे भोळा सांब,
चकाकणारे कुठे संगीतमय खांब!
मंदिरात हरवुनी मन माझे जाय!
या दगडांशी जडले नाते काय?
हिंदुपतीस इथे गाभाऱ्यात पुजती,
नायक औरंग्यास पाणी इथेच पाजती!
पराक्रमाची शर्थ इथेच झाली काय?
या दगडांशी जडले नाते काय?
गडकिल्ले मंदिर राऊळं नवी जरी
ओळखीची वाटती मला ही सारी
हरवुनी इथे मला मीच सापडून जाय
या दगडांशी एकरूप होईन काय?
दक्षिणदेशाची सांगता सांगता कथा,
कळावी जनास पराक्रमाची प्रथा!
आणि मागणे माते तुझपाशी काय?
तुझ्या दगडांशी मी एकरूप होऊनि जाय!
-प्रांजल वाघ ©
२४.०८.२०२०
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
15 comments
वाह! खूप सुदंर
धन्यवाद ज्योती!! 😀
वाह? मस्तच!?
आभारी आहोत!! 😀
आवडली असल्यास आल्या पेजवर शेअर करा!!
अप्रतिम…वाह..!
धन्यवाद सर!!
Very nice Pranjal
आभारी!!
प्रांजल
जबराट झाली कविता…
लय आणि आशय दोन्ही छान केलेत
अजून थोडं काम केलं तर वृत्तात बांधता येईल.
अनेक शुभेच्छा
आभारी आहे! पुढच्या वेळी नक्की!!
सुंदर
धन्यवाद अजय सर!
aakar aalela dagad
aakaar aalela dagad
Waah
Thank you!