There are 2 kinds of fatigues- one is mental fatigue, which is usually what happens to me at the end of the day.
The other kind is the physical fatigue…when i have come in a crowded train, and then standing for half an hour in the bus. I am unable to process anything, I dont know what I talk, and i dont even remember anything the next day
It is on these days that I am really not capable of doing anything..
And the last thing you need on such a day is a fight…..this poem is about one such day….
आज नाही आहे शक्ति
कोणालाच समजून घायची
कुणाची गोष्टा ऐकून
त्यावर विचार करायची
आज नाही आहे शक्ति
अजुन कोणाला मनवायची
रूस्वे फुगवे दूर करत
गोड गोड बोलायची
आज खरतर नाही आहे शक्ति
रुसूनही बसायची
कोणी सॉरी म्हणायला येईल
वाट त्याची बघायची
आज नाही आहे शक्ति
भांडण दूर करायची
आपली बाजू मांडून
ती कोणाला पटवायची
आज नाहीच आहे शक्ति
स्वताची टीका ऐकायची
स्वताच्याच नझरेत मग
परत परत पडायची.
आज नाही आहे शक्ति
खरच काही बोलायची
परके तर जाउच दे
जवळच्यांशी ही काही बोलायची
अस वाटत जाउ दे …होईल ते होऊ दे
समजेल ते समजू दे
आणि वाट्टेल ते वाटू दे
आज खरच नाहीच आहे शक्ति…
आभा देशकर
२२/०७/२०११
6 comments
hey good one… :)…
really AJ KHARACH NAHI AHE SHAKTI…………..
This poem remindds me of an old one–ek diwas asa yeto sara mohara firun jato
watan asate jeevan mhanaje ganitache lambode pustak–etc
Can you give me all the lines of this poem? I am looking for it for long time
ek diwas asa yeto sara mohara firun jato
watan asate jeevan mhanaje ganitache lambode pustak
Julat nahi ekahi koshtak
bhanabhanun jate mastak
What is after this?
Rekha, Niranjan,
Did you find out about the poem. I would love to get the entire poem and also who wrote it. Thanks.
एक दिवस असा येतो
एक दिवस असा येतो,
सारा मोहरा फिरुन जातो.
वाटत असते अंधाराची
रात्र नाही उजाडायची,
वाटत असते जीवन म्हणजे
गणिताचे लांबट पुस्तक ,
जुळत नाही साधे कोष्टक ,
भणभणून जाते मस्तक .
रीत तर चूकली नाही,
आकडा तर हुकला नाही,
रात्र तशीच निघुन जाते.
एक दिवस असा येतो,
कुठून तरी कवी येतो,
जुळते गाणे गाऊन जातो
मीही हळूच हसून बघतो
गणीतातून गाणे गातो.
एक दिवस असा येतो,
मनाचा पारा उडून जातो,
आर पार दिसू लागते,
माझेच भूत मला बघते
झाले काय गेले काय ,
गतकाळाचे उलटे पाय,
मिठी मारते मळकी वाट,
म्हणते पुन्हा उतर घाट,
खोल दरीत जळतो कोंब,
उभ्या पोटात उठतो डोंब.
तोच कोणी मागून येते ,
अपुल्या नाजुक नाजुक हाते,
माझे डोळे झाकुन धरते..
मि हि हळुच हसुन बघतो..
साराच मोहरा फिरून जातो
असा दिवस नसता आला
कधीच मोडले असते घर..
पण असे होत नाही ,
काळे पिसे राहत नाही,
असा दिवस येतोच येतो,
सारा मोहरा फिरून जातो..!!
-विनायक महादेव कुलकर्णी