डोंगराच्या धारेवर, एकाकी मी उभा; थक्क होऊन पाहतो तुला, हे अनंत,अथांग नभा! जणू भव्य निळ्या रंगाची , पृथ्वीने शाल पांघरली; स्वर्गीय रूप घेऊनी हे, मूर्तिमंत मयसभाच अवतरली! पाहुनी ते गहिरे रूप, अगम्य धुक्याने वेढले! किती अगाध आसमंत हा?…
काहिलीतील सुख!
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून, सूर्याची आग सहन करीत, तो चालत असतो… आयुष्यातील चटके, जणू कमी वाटू लागले, म्हणून आग ओकून, हा सूर्य भाजून काढत असतो! मग त्याची नजर वर जाते, काळे ढग शोधण्याची एक केविलवाणी धडपड, ती…
काही कळेना मला..
आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे की माझ्या मनात काहुर माजलाय? काही कळेना मला… हा गडगडाट होतोय की छाती मध्ये धडधडतय? काही कळेना मला… वारा सुटलाय बेभान की माझ मन वाहवत चाललय? काही कळेना मला… मेघातून पाणी पडतय की…