Archive for the ‘Marathi Poems’ Category

Share

 

आज अचानक घरी जाता जाता,

भरून आलेलं आभाळ फाटलं,

सरीवर सारी बरसू लागल्या,

आणि मनाला एकच वाटलं!

 

मला हवं तेव्हाच पाऊस पडावा,

मी सांगितलं, "जा!", की तो निघून जावा ,

पण असं पाऊस कुणाचं ऐकतो का?

जा म्हटलं की जातो का?

 

पाऊस येतो तो एकटा येत नाही,

तुझ्या आठवणी तो सोबत घेऊन येतो ,

जुन्या आठवणीत मी हरवून जाताच ,

माझे अश्रू हा पाऊस समावून घेतो !

 

पण ह्या पावसाचा जोर काही वेळापुरताच असतो,

थोड्याच वेळात सूर्य आकाशात हसतो,

पण तुझ्या आठवणींच असं थोडंच आहे?

पाऊस गेला तरी मी तुझ्यातच हरवून बसतो…

Picture Credit: Sambhaji Chopdekar

 

- प्रांजल वाघ

०२ जुलै २०१२

Share
Share

 

सकाळी  ट्रेन साठी  पळायच

संध्याकाळी  बस साठी पळायच

मधे ऑफीस ला पळायच

दुपारी लंच ला पळायच

 

कधी मोटे झाले म्हणून पळायच

कधी टेन्षन रिलीस करायला पळायच

कधी फ्रेंड्स बोलावतात म्हणून पळायच

तर कधी टीचर ला बघून उल्ट पळायच

 

कधी मी मागे राहीले म्हणून पळायच

कधी दूसरे पुढे गेलेत म्हणून पळायच

माहीत नसेल तरी पळायच

कधी सगळे पळताएत म्हणून पळायच

 

प्रेमात पडल्यावर पोरा मागे पळायच

मग घरच्यान पासना पळायच

लग्न झल्यावर घरा मागे पळायच

भांडण झल्यावर मग आई कडे पळायच

 

काम करायला बाई मागे पळायच

काही बिघडल म्हणून प्लमबर/एलेक्ट्रीशियन कडे पळायच

रात्री बंद व्हायच्या आधी इस्तरीवाल्या कडे पळायच

आजारी पडल्यावर मग डॉक्टोरांकडे पळायच

 

पळता पळता मग एके दिवशी मरायच

या पळण्याला मग जगणे म्हणायच ?

 

“पळणा ही ज़िंदगी है….. पळति ही जा रही है….”

आभा देशकर

२९/३/२०१२

Share
Share

There are 2 kinds of fatigues- one is mental fatigue, which is usually what happens to me at the end of the day.

The other kind is the physical fatigue…when i have come in a crowded train, and then standing for half an hour in the bus. I am unable to process anything, I dont know what I talk, and i dont even remember anything the next day

It is on these days that I am really not capable of doing  anything..

And the last thing you need  on such a day is a fight…..this poem is about one such day….

   

आज नाही आहे शक्ति

कोणालाच समजून घायची

कुणाची गोष्टा ऐकून

त्यावर विचार करायची

 

आज नाही आहे शक्ति

अजुन कोणाला मनवायची

रूस्वे फुगवे दूर करत

गोड गोड बोलायची

 

आज खरतर नाही आहे शक्ति

रुसूनही बसायची

कोणी सॉरी म्हणायला येईल

वाट त्याची बघायची

 

आज नाही आहे शक्ति

भांडण दूर करायची

आपली बाजू मांडून

ती कोणाला पटवायची

 

आज नाहीच आहे शक्ति

स्वताची  टीका ऐकायची

स्वताच्याच नझरेत मग

परत परत पडायची.

 

आज नाही आहे शक्ति

खरच काही बोलायची

परके तर जाउच दे

जवळच्यांशी ही काही बोलायची

 

अस वाटत जाउ दे …होईल ते होऊ दे

समजेल ते समजू दे

आणि वाट्टेल ते वाटू दे

 

आज खरच नाहीच  आहे शक्ति…

 

आभा देशकर
२२/०७/२०११

Share
Share

मलाच न कळले केव्हा हे मन तुझं होऊ लागलं

मला न सांगता हे मन माझं… तुझ्यात गुन्तु लागलं ..

त्या दुपारी ..

त्या दुपारी विचारलंस तू कि …माझी होशील का ?

 न परवानगी मागितली माझी ..न विचार केला क्षणभर ..

लगेचच होकार देऊन.. मन हे मोकळं झालं

मलाच न कळले केव्हा हे मन तुझं होऊ लागलं

तू स्वप्न मला दाखवली …

तू स्वप्न मला दाखवली आणि त्यात रन्गून हे गेलं..

 आयुष्याच्या चित्रात तुझेच रंग भरवत गेलं ..

सगळेच रंग हवे हवे से,इंद्रधनुष्य हे पूर्ण झालं

मलाच न कळले केव्हा हे मन तुझं होऊ लागलं..

तुझ्या सवयी

तुझ्या सवयी तुझ्या आवडी.. तुझीच भाषा हे बोलू लागलं

तेव्हा साण्शी ला चिमटा आणि वरणाला – आमटी हे म्हणू लागलं .

जेव्हा कळले हे त्याला तेव्हा स्वतावरच हसू लागलं ..

मलाच न कळले केव्हा हे मन तुझं होऊ लागलं..

तू दूर गेलास

तू क्षणभर दूर गेलास .. तर हे मन वेडापिसा झालं

तुझ्या आठवणी, तुझ्या काळजीने मन हे व्याकूळ झालं

कुठेच अजून लागत नाही ..तुझाच विचार करत राहिलं ..

मलाच न कळले केव्हा हे मन तुझं होऊ लागलं ..

आभा देशकर

११/०४/२०११

Share
Share

 

"वत्सा,वेळ हे सर्वोत्तम औषध आहे!",
अस माझे मित्र म्हणाले होते,
पण तू गेलीस अन् प्रत्येक क्षण,
काळ बनायचा माझ्यासाठी!

सुरुवातीला दु:ख तर झालच
जीवघेण्या वेदनाही झाल्या!
काही अश्रू बनून ओघळून गेल्या,
काही मनातल्या मनात लपून राहिल्या…

"विसर आता तिला, आपल आयुष्य जग!",
थोर अनुभवी लोक सांगू लागले.
पण ह्यांना मी कस सांगू,
माझा जीव तुझ्यात अडकलाय ते?

 

पण मग मीच म्हटल स्वतःला,
किती दिवस तिची आठवण काढणार?
आपल आयुष्य तिच्या आठवणीत
अस वाया तरी कस घालवणार? 

मग मी घेतला निर्णय
कामात पुरता बुडून गेलो!
तुझ्या सार्‍या आठवणी
खोल कुठेतरी मनात पुरून बसलो! 

विसरलो होतो मी तुला
अस वाटल खर मला
पण मग परवा मी भेटलो तुला
आणि कोण जाणे काय झाले मला!

तू अधिकच सुंदर दिसलीस!
हृदयामध्ये परत घन्टी वाजली!
पोटात गोळा आला!
आणि पावसात देखील उन्हे पडली!

पुर्वी व्हायचे जसे,
आजही अगदी तसेच झाले!
मनात विचारांची गर्दी झाली,
पण बोलता मात्र काहीच नाही आले!

पण तुझा प्रत्येक शब्द, तुझा प्रत्येक क्षण
मी त्या संध्याकाळी जपून ठेवत होतो!
तुझ्याबरोबरची ती संध्याकाळ
मनामध्ये मी साठवत होतो!

जेव्हा तुझी निघायची वेळ झाली
हृदयातून एक कळ आली
तू निघून जाणार मला एकटा सोडून
ही जीवघेणी जाणीव झाली!

"जाऊ नकोस, मला तू हवी आहेस!"
अस तुला सांगू शकत नव्हतो
तुझ्यावर नसलेला हक्क
मी बजावू शकत नव्हतो!

तू गेलीस
अन् अंधार झाला!
आयुष्यातला प्रकाश गेला
अन् काळोख पडला!

तू नाहीस माझ्यासोबत
ही जाणीव होत होती!
तू नसणार कधीच माझ्याबरोबर
ही जाणीव जीव जाळीत होती!

पण असे का व्हावे,
हे मला कळत नव्हते
मन उदास का झाले,
हे मात्र समजत नव्हते!

मग कळल मला
आणि मी जाणून चुकलो!
तुला मी कधीच विसरलो नव्हतो,
मी अजूनही तुझ्याच प्रेमात होतो!

मला वाटले मी सावरलो होतो,
माझ नव आयुष्य जगत होतो
पण सत्य तर हेच आहे
तुझ्यातच माझ जीवन आहे!

तू नाहीस माझी,
मला माहीत आहे
पण मी तुझा नसून देखील
तुझाच, फक्त तुझाच आहे!

- प्रांजल वाघ
  २४ डिसेंबर २०१०

 

PS: All credits for the title of the poem to my friend, Tejas Thatte. Thanks!!

 

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share
Share

:)

माझ्यावर रुस्णारा तो तूच..

मग मला मनवणारा पण तूच..

 

स्वप्ने दाखवणारा तो तूच..

आणि कधी कधी स्वप्नात येऊन त्रास देणारा तो तूच

 

आकाशात उडून भरारी मार..अस म्हणारा तो तूच

आणि आपल्या मिठीत पकडून ठेवणारा तो तूच…

 

कधी लहान मुला सारखा वागणारा तो तूच 

आणि कधी माझी काळजी घेणारा तो तूच…

 

कधी कधी न ऐकता फोन ठेवणारा तो तूच

आणि तस्संतास गप्पे मारणारा तो तूच…

 

माझ्यावर हक्काने ओरद्णारा पण तूच

आणि माझा सल्ला घेणारा तो तूच

 

दररोज रात्री झोपवणारा तो तूच…

आणि भांडल्यावर रात्रभर जागवणारा तो तूच….

 

स्वतंत्र हो म्हणारा तो तूच

आणि “मी नेहमीच आहे” अस म्हणारा पण तूच..

 

छोट्या छोट्या गोष्टी ची आठवण करून देणारा तो तूच

आणि सगळ जग विसरवणारा पण तूच…

 

तूच दिवसात..आणि रात्री पण तूच…

तूच स्वप्नात आणि अस्तित्वात तो तूच…

 

माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा तो

तूच तूच आणि तूच :)

 

-आभा देशकर

२२/१२/२०१०

Share
Share

Dedicated to the “generation gap” ;)

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
पण तुमच – आमच काहीच सेम नसत

तुम्ही लिहिलेल एक-मेकाना प्रेम पत्र असत
आमच मात्र फॉर्वर्डेड मेसेजस च तंत्र असत

झाडा मागून बघण्याच तुमच हे सेटिंग असत
हातात हात घातलेल आमच खुल्लांखुल्ला लफड असत्

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
पण तुमच –आमच काहीच सेम नसत

तुमच्याकडचा एक फोटो, तुमच्यासाठी सर्वस्व असत
आमच पूर्ण हार्डडिस्क एक मेकांच्या फोटोस नि भरलेल असत

घरातल्या मोठ्यांच्या हस्ते तुम्ही पाठवलेल नेरोप असत
आम्ही  घरच्यांना  नंतर संगितलेल  हे एक छोटस सीक्रेट असत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
पण तुमच – आमच काहीच सेम नसत

मुलगा-मुलगी दाखवण्याच तुमच ते कार्यक्रम असत
आम्हच मात्रा आधीच हार्ट -टू-हार्ट कॉन्वर्सेशन झालेल असत

तुम्ही फिरायला जाता ते एक एकांत नदी च काठ असत
आम्हला मात्रा भरलेल्या मौल मधे मिळालेल एक कॉर्नर असत

तुमच जन्म जनमान्तराच झालेल एक कमिटमेंट असत
“ पुढच पुढे बघू “…आम्ही फक्त इत्कच ठरवलेल असत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
पण तुमच – आमच काहीच सेम नसत

-आभा देशकर
१७/१२/२०१०

Share
Share

 

आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे
की माझ्या मनात काहुर माजलाय?
काही कळेना मला…

Pic 173
हा गडगडाट होतोय
की छाती मध्ये धडधडतय?
काही कळेना मला…

वारा सुटलाय बेभान
की माझ मन वाहवत चाललय?
काही कळेना मला…

मेघातून पाणी पडतय
की आसवांचा पाउस कोसळतोय?
काहीच कस कळेना मला..

DSCN0046

ढग भेदून एक किरण आला
की मनात आशेचे अंकुर फुटले?
थोडस समजू लागलय…

धुरकट धुक नाहीस होतय
आणि नव्या वाटा दिसू लागताहेत
थोड स्पष्ट दिसू लागलय खर…

DSCN0074 

प्रत्येक फूल हसतय
आणि माझी कळी देखील खुलली 
   मनात प्रकाश पडू लागलाय माझ्या…

 
Copyright © Pranjal A. Wagh

प्रत्येक काळ्या रात्रीनंतर
एक तेजस्वी सकाळ येते
हे आता लक्षात आलय माझ्या!

 

- प्रांजल वाघ
१८ जून २०१०

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share
Share

मी बोलू लागतो,
त्या पावसाबरोबर.
माझ्या एकटेपणात,
तोच माझा मित्र असतो.

थेंबाना विचारतो मी,
तिच्याबद्दल.
थेंब मग तिच्या आठवणी होतात
आणि हातावर त्यांना झेलतो मी.

त्या टप टप पावसात मग,
तिच हसू ऐकू येतं.
दाटलेल आभाळ,
तिचे केस होतात.

वारा मग,
त्या बटा उधळून लावतो
आणि त्या सागरात
मन तरंगत राहतं.

जुन्या आठवणी अचानक,
मन आठवू पाहतं.
हरवलेल्या भेटी,
पुन्हा शोधू लागतं.

त्या आठवणी ,
मी पुन्हा जगू लागतो.
पावसाच्या सोबतीनं,
मी तिला भेटून येतो.

माझ्या हास्यात पाऊस,
हसू होऊन बरसतो.
ओघळणारे अश्रू ,
आपलेच समजून पिऊन टाकतो.

पाऊस थांबला ,
की मग वाईट वाटतं.
मित्र दूर गेल्याचं ,
दुःख होतं.

पण मग परत,
ढग जमा होतात.
परत आभाळ फाटतं,
परत पाऊस येतो.

पुन्हा आम्ही बोलू लागतो.
कारण,
माझ्या एकटेपणात,
तोच माझा मित्र असतो.

-प्रांजल वाघ
१ ज्ञुलै २००९


Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share
Share

Part 2 of the Politics Mix series. Part 1 was published on 10 April 2009.

( “याव याव खमौ ब्येब्स
डू द बीट्स नाउ
पंप अप द बेस डॉग!” )

सकाळ झाली सूर्य डोंबल्यावर आला,
म्या बी उठलो न आलो की ओसरीवर.
पाहतो तर काय,
आमचा आजा, होता फेरी घालीत.
दर दोन मिनिटांनी हात जोडीत,
न हात उंचावून शांत करण्याची नक्कल करीत.

मला वाटल म्हातारा वेडा झाला,
वयाच्या ऐंशीज मध्ये काय खूळ घेऊन बसला!

म्या म्हनला आज्याला,
“काय र आज्या, हे काय करून राहिला रे तू?”
“अस खादी घालून, ध्वॉतर नेसून,
एकटाच नमस्कार करीत काय फिरतोस?”

आजा नमस्कार करीत म्हनला (चिरक्या आवाजात),
“देखिये….हम इस बार गावाच्या सरपंच पद के लिये निवडणूक लढ रहे है”
अगदी श्वाकच बसला मला!
“आर आजा, तुझा वय आता ऐंशी, तू कशी काय लढणार विलेक्शन?”
“ह्या वयात हे जमणार कस तुला?”
(मनातल्या मनात म्हन्लो, ” म्हातारा बहुतेक झालाय खुळा!”)

आज्याने आपला थरथरणारा हात हळू हळू उचलला
न माज्या गालावर मायेने ठेवला.
म्या म्हन्लो, ” आर, लाड कशापाई करतोस?”
“बोल, माज्या प्रश्नाच उत्तर कधी देतोस?”

तर वैतागून आजा म्हन्तो कसा,
“ए, भुस्नळ्या, म्या लाड न्हाई क्येले,
म्या तर तुझे मुस्काट फोडले!
माझे हात थरथरले म्हनून
तुला नाय कळले!”

“म्या असेन ऐंशी
पण अजुन पन जवान हाय,
परवाच उंदीर मारला,
म्या निडर हाये!
ट्वायिलेटला कदी जायाच
हेची तुझा बा न्हाय आठव करून देत,
म्याच ठरीव्तो!
म्या निर्णायक हाये!.”

” म्हातारा झालो म्हुन काय झाल?
मला बी सत्ता ट्येस्ट करायची हे!”
म्या चक्रावलो, म्हन्लो,
” आर पण, गावातल्या यंग उमेदवारांच काय?”
आजा आन्खी वैतागला, ” ए शान्या, गप र्‍हा की!
म्या विलेक्शन लढणार म्हंजे लढणार!
जास्त बोललास,
तर माझ्या ‘लाल’ छ्डीने ‘आडवा आणी’ उभा फोडून काढीन!”

म्या म्हटला ” स्वाँरी आजा, माफी असावी!”
तर आजाचा थरथरणारा हात परत गालावर फिरला!
म्या वैतागलो, ” आता कशापाई मारतो?
आजा आपले खोटे दात दाखवत म्हनला,
” म्या तुझा आजा, माज्या राजा!
म्या लाड केले नाही मारली मुस्काटात!
चल आता रुसु नकोस,
गाडी काढ आपली,
रथ यात्रा काढली पायजे,
ह्या यंग गावाला
म्या ऐंशी वर्षाचा तरुणच
नीडर नि निर्णायक बनवू शकतो,
हा नि चा पाढा पढवला पायजे!”

-प्रांजल वाघ

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share