Order Viagra New Zealand Yasmine Contraceptive Pill Buy Famvir For Cold Sores Buy Chloroquine Together With Proguanil Aricept 10mg Tab
A Rational Mind

पुन्हा झुळुक…

 

"वत्सा,वेळ हे सर्वोत्तम औषध आहे!",
अस माझे मित्र म्हणाले होते,
पण तू गेलीस अन् प्रत्येक क्षण,
काळ बनायचा माझ्यासाठी!

सुरुवातीला दु:ख तर झालच
जीवघेण्या वेदनाही झाल्या!
काही अश्रू बनून ओघळून गेल्या,
काही मनातल्या मनात लपून राहिल्या…

"विसर आता तिला, आपल आयुष्य जग!",
थोर अनुभवी लोक सांगू लागले.
पण ह्यांना मी कस सांगू,
माझा जीव तुझ्यात अडकलाय ते?

 

पण मग मीच म्हटल स्वतःला,
किती दिवस तिची आठवण काढणार?
आपल आयुष्य तिच्या आठवणीत
अस वाया तरी कस घालवणार? 

मग मी घेतला निर्णय
कामात पुरता बुडून गेलो!
तुझ्या सार्‍या आठवणी
खोल कुठेतरी मनात पुरून बसलो! 

विसरलो होतो मी तुला
अस वाटल खर मला
पण मग परवा मी भेटलो तुला
आणि कोण जाणे काय झाले मला!

तू अधिकच सुंदर दिसलीस!
हृदयामध्ये परत घन्टी वाजली!
पोटात गोळा आला!
आणि पावसात देखील उन्हे पडली!

पुर्वी व्हायचे जसे,
आजही अगदी तसेच झाले!
मनात विचारांची गर्दी झाली,
पण बोलता मात्र काहीच नाही आले!

पण तुझा प्रत्येक शब्द, तुझा प्रत्येक क्षण
मी त्या संध्याकाळी जपून ठेवत होतो!
तुझ्याबरोबरची ती संध्याकाळ
मनामध्ये मी साठवत होतो!

जेव्हा तुझी निघायची वेळ झाली
हृदयातून एक कळ आली
तू निघून जाणार मला एकटा सोडून
ही जीवघेणी जाणीव झाली!

"जाऊ नकोस, मला तू हवी आहेस!"
अस तुला सांगू शकत नव्हतो
तुझ्यावर नसलेला हक्क
मी बजावू शकत नव्हतो!

तू गेलीस
अन् अंधार झाला!
आयुष्यातला प्रकाश गेला
अन् काळोख पडला!

तू नाहीस माझ्यासोबत
ही जाणीव होत होती!
तू नसणार कधीच माझ्याबरोबर
ही जाणीव जीव जाळीत होती!

पण असे का व्हावे,
हे मला कळत नव्हते
मन उदास का झाले,
हे मात्र समजत नव्हते!

मग कळल मला
आणि मी जाणून चुकलो!
तुला मी कधीच विसरलो नव्हतो,
मी अजूनही तुझ्याच प्रेमात होतो!

मला वाटले मी सावरलो होतो,
माझ नव आयुष्य जगत होतो
पण सत्य तर हेच आहे
तुझ्यातच माझ जीवन आहे!

तू नाहीस माझी,
मला माहीत आहे
पण मी तुझा नसून देखील
तुझाच, फक्त तुझाच आहे!

– प्रांजल वाघ
  २४ डिसेंबर २०१०

 

PS: All credits for the title of the poem to my friend, Tejas Thatte. Thanks!!

 

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.