पावलागणिक उडणारी धूळ-माती, सांगती मला कोण्या जन्माची नाती? रेंगाळतो इथे मी, निघत नाही पाय, या दगडांशी जडले नाते काय?
Tag:
Rock
बालेकिल्ल्याचा उतार आणि चंद्रगडाचा दक्षिण दरवाजा ह्यांच्या मधोमध, दिव्याने ठिणगी देताच सुक्या गवताने पेट घेतला आणि बघता, बघता वणवा पेटला होता! वेळ न दवडता आम्ही आग नसेल तिथून पुढे पुढे …
जावळीच्या घनदाट आणि निबिड अरण्यातून उभे राहून आकाशाकडे झेपावणारे डोंगर आमची नजर खिळवून ठेवीत होते! सारं सारं आम्ही नुसते नजरेत साठवत होतो!
लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले.
माझ्यासाठी लिंगाणा आता एक पर्वत उरला नव्हता. तो एखादा सुळका, एखादा किल्लादेखील नव्हता. तो होता एक अत्यंत उग्र तपस्वी!
अचानक डोळ्यांसमोर आला तो लिंगाण्याचा बुलंद सुळका! मनात त्याचा चढ स्पष्ट दिसू लागला. तेथील प्रत्येक कातळ टप्पा नजरेत येऊ लागला!
नजर भिडली ती त्या हुकलेल्या शिखराला. मनातल्या मनात स्वतःलाच लाखोली वाहिली! त्याच्याकडे बघत मनोमन एक निश्चय केला.आपण परत यायचं! परत चढाई करायची! आणि ह्या वेळी ती यशस्वी करून दाखवायची!