192
– संमोहन-

Colors of the Sunset on 23 July 2020
रंगांची उधळण करतो
भिरभिरता सांजवारा
रंगी नभीच्या न्हाउनी
तृप्त झाली धरा
श्रावणात धुळवड खेळतो
वृंदावनीचा गोपाळ प्यारा
कुंचला आकाशी फिरवूनी
रेखाटला सप्तरंगी पसारा
रूप देखणं मी पाहतो
स्तब्ध आसमंत सारा
संमोहित पाखरू होऊनि
ज्वाळेवर झेपावतो जरा
-प्रांजल ©️
२३/०७/२०२०
2 comments
Nice one
Thank you sir!!