माझ्यासाठी लिंगाणा आता एक पर्वत उरला नव्हता. तो एखादा सुळका, एखादा किल्लादेखील नव्हता. तो होता एक अत्यंत उग्र तपस्वी!
Tag:
Trekking
अचानक डोळ्यांसमोर आला तो लिंगाण्याचा बुलंद सुळका! मनात त्याचा चढ स्पष्ट दिसू लागला. तेथील प्रत्येक कातळ टप्पा नजरेत येऊ लागला!
नजर भिडली ती त्या हुकलेल्या शिखराला. मनातल्या मनात स्वतःलाच लाखोली वाहिली! त्याच्याकडे बघत मनोमन एक निश्चय केला.आपण परत यायचं! परत चढाई करायची! आणि ह्या वेळी ती यशस्वी करून दाखवायची!