महाराष्ट्र माझा!

by Pranjal Wagh
39 views

This article was written by me for www.marathimati.com and can be viewed here


महाराष्ट्र
….
या नावातच सारं काही आलं!
महा राष्ट्र!
या राष्ट्रात विवधता अगदी ठासून भरलेली आहे!
इतिहास, निसर्ग, कला, साहित्य, पाककला ह्या सगळ्यात इतकं वैविध्य क्वचितच जगात आढळेल!

ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का?
जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा संभाजी नावाच्या एका ‘पोराने’ पहिली नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले!

पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या दिल्लिचं तख्त काबिज़ करून ह्या महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही ताकत आहे इथल्या मंगटातली!

जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण!
इथला कोंकण किनारा,इथला समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्ये…
इथली वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली आहे! इथली फळ ही जगप्रसिद्ध आहेत! सार्‍या दुनियेला वेड लावणारा फळांचा राजा हापूस आंबा देखील महाराष्ट्राचाच!

हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे! ह्या मातीला कलादेवतेच वरदान आहे! सतार इथेच जन्माला आली! वारली कला, बिद्रि कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला हे सारे प्रसिद्ध तर आहेतच पण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग हा अगदी पूर्वापार चालत आलेला आहे! पैठणी, नारायणी पेठ ह्या साड्या म्हणजे इथली शान आहेत!
इथली झणझणीत लावणी, खडे पोवाडे, कोळी गीत, भारुड हे सर्वांना भुरळ घालतात! इथली रंगभूमी, इथली नाट्यगीत सारी जगावेगळी!
भारतातील पहिला चित्रपट देखील ह्याच भूमीत तयार झाला!
अशी आहे महाराष्ट्राची कला परंपरा!

मराठी साहित्या म्हणजे रत्न-हिरे ह्यानी खचून भरलेली खाण आहे.
पु.ल. देशपांडे,कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी ही ह्या खाणीमधली काही रत्ने!
विनोदी, ऐतिहासिक, विडंबनात्मक …. जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील!
700 पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेली ही आमची मायबोली ह्या प्रचंड साहित्य परिवाराने आणखीच खुलते!

महाराष्ट्रीय जेवण म्हणजे तर स्वर्गाहून सुंदर!
इथली पुरणपोळी, थालीपीठ, चकली ,चिवडा, श्रीखंड सगळ्यांना तौक आहे पण इथल्या प्रत्येक शहराला आपली एक पाक संस्कृती लाभलेली आहे.
मुंबईचा वडा पाव,नागपूरच्या सावजी समुदायाचे तिखट जेवण,वडे-भात, कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा,मिसळ, सातारी क्न्दी पेढे, पुणेरी मिसळ, कोंकणी आआणी मालवणी जेवण….अहाहा! पाणी सुटल तोंडाला! हे तर फक्त मोजके नमुने आहेत!

तर असा आहे आमचा महाराष्ट्र! कणखर आणि राकट तरी सार्‍याणा माया लावणारा आणि जपणारा!

प्रांजल वाघ

Creative Commons License
This work by
Pranjal A. Wagh
is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

1 comment

Anup March 1, 2012 - 9:57 AM

सावजी 😀 😀
Sahiyeee chhan lihilay.. Keep it up!!!

Reply

Leave a Comment

You may also like