Prilosec Buy Two Get 25 Back Buy Nolvadex Us Maxalt Get High Buy Kamagra Online South Africa Cialis Medication For Bph
A Rational Mind

पॉलिटिक्स मिक्स – १


आमचा ‘सोन्या’ हाय नव्ह,
अमरिकेचा,
त्यो येनार हुता हित, कायमचा!
म्हनून त्येला आणाया गेल्तो इमान्तळावर.

त्यो आला तवा त्येला ओळख्लाच न्हाय!
एकदम खादी मध्येच अस्सा समुर आला,
म्या म्हटला ” देवा, सोन्याचा असा काय झाला?”

सोन्याला विंग्रजीत म्हटला
” काय सोनोपंत, ह्यो काय केलय ध्यान?
कुठली तुमी तलवार आणि कसली घातलीया तुमी म्यान?”

त्यावर सोन्याने घेतला लाम्बलचक पॉज़,
खिष्यात हात घातला, नि काढला एक कागुद.
कागुद वाचीत म्हन्तो कसा?
” मी ठुम्च्या गावात निव्हाड्न्युक लॅडनार आहे”

सौरव गांगूली बॉल लागल्यावर उडतो
तसा मी बी उडालो!
लेका तुला न्हाय इथला काय माहीत
ना भाषा, ना काही, तू फॉरिनर,
आन् तू कसा काय उभा राहणार
इंडियाच्या विलेक्शन मधी?

विंग्रजीत सोन्या म्हन्तो कसा
(आता सगळाच कागुदवर असता व्हय, मराठीत बोलाया?)
“काळजी नसावी. आपल्याच गावचा ‘मोहन’ हाये,
त्येच ‘मन’ तयार केलय,
मी जित्लो तर त्यो र्‍हाईल माझ्या जागी
मी फकस्त पाठिंब्याचा ‘हात’ द्येतो,
हुबा राहतो मागी मागी!
सत्ता आल्यावर हाती,
काय बरा-वाईट झालाच
तर फोडू खापर मोहनच्या माथी!”

म्या चक्रावलो, म्हनला,
“असा कधी व्हतय काय?”
सोन्या दात दाखवित म्हनला
” गोष्ट न्हाई ही पूर्वीची फार,
तुमच्याच कंट्री मधी
हुतय हे सिन्स दोन हजार च्यार!”

-प्रांजल वाघ

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.