A Rational Mind

चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग २)

…जाता गोवळी! (भाग २) (भाग १ इथे वाचा) ढवळे गावातील पहाटेची निरव शांतता आणि आमची साखर-झोप खाड्कन मोडली. एक बाबा विठ्ठलाच्या देवळात पहाटे  ५ वाजता देवळात जोर जोरात श्लोक “म्हणत" होता.  दिवसाला अशी भक्तीपूर्वक सुरुवात मिळाल्यावर पुढचा दिवस चांगला जाणार…

चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग १)

  येता जावळी ….. (भाग १)   नुकताच घेतलेला नवा कोरा गो-प्रो कॅमेरा वापरण्याची उत्सुकता, जावळीच्या घनदाट अरण्याने फार पूर्वीपासून घातलेली मोहिनी आणि पुण्यातले ते तिघे ट्रेकर – मला काही स्वस्थ बसू देईनात. बरं, विश्वासू सूत्रांनी आणखी एक खबर दिली…

वेध पावसाळी भ्रमंतीचा

  “माझी सहेली” मासिकाच्या जून २०१४ च्या “मान्सून स्पेशल” अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख स्कॅन करून खाली देत आहे. आपण सर्वांनी तो वाचवा अन त्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही विनम्र विनंती! 🙂     – प्रांजल वाघ © ०१ जून…

पहिले पाऊल

    डोंगराच्या धारेवर, एकाकी मी उभा; थक्क होऊन पाहतो तुला, हे अनंत,अथांग नभा! जणू भव्य निळ्या रंगाची , पृथ्वीने शाल पांघरली; स्वर्गीय रूप घेऊनी हे, मूर्तिमंत मयसभाच अवतरली! पाहुनी ते गहिरे रूप, अगम्य धुक्याने वेढले! किती अगाध आसमंत हा?…

लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग ३)

( भाग २ इथे वाचा)   आरोहण !!   "बिले टाईट!" लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले. चढाई सुरु करण्यापूर्वी पाठीवर…

लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग २)

(भाग १ इथे वाचा)   … जाणुनियां अवसान नसे हें!   जरा वैतागूनच डोळे उघडले! जानेवारीचा महिना अन त्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरव्यागार झाडीने वेढलेला गाव हे समीकरण जुळून आलं की जी थंडी पडते त्याला कडाक्याची थंडी म्हणतात! हीच थंडी…

लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग १)

पूर्वार्ध इथे वाचा आरंभ!! “सम्या , भगवा घेतलास का?” विसरू नकोस!” जवळ जवळ दिवसांतून ५-६ वेळा मी हे समीर पटेलला विचारलं होतं. त्याचं कारण  सुद्धा तसंच होतं. २६ जानेवारीला २०१३ ला आम्ही लिंगाण्यावर पुन्हा चढाई करणार होतो! मागच्या वर्षीच्या सपशेल…

लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती!

२६ जानेवारी २०१३ ह्या दिवशी समीर पटेल, रोहन  शिंदे, Christian Spanner आणि मी लिंगाणा सर करून अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केले! ह्या पूर्वी एक अयशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. ही गोष्ट त्या दोन्ही प्रसंगांची आहे, लिंगाण्याने दिलेल्या धड्यांची…

तिमिरांत

  जगण्याच्या वाटेवरती,पदोपदी पसरली आगआशेच्या शिखरावर बसला,नैराश्याचा विषारी नाग!   क्षितिजावर दाटल्या ढगांना,भेदून येतो प्रकाश!पडती खिंडारे त्या भिंतीस,मोकळे होत जाते आकाश! त्या निळ्या आभाळात मजला,होतो तव नयनांचा भास,अन् मग हरलेल्या लढाईला होतेविजयाची आरास! – प्रांजल  © 31 Aug 2013  …

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.