Archive for the ‘Marathi articles’ Category

Share

थोरले बाजीराव पेशवे (१७०० -१७४०)

थोरले बाजीराव पेशवे (१७०० -१७४०)

नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…आमच्या गाडीचा ड्रायव्हर  मूळचा इंदोरचा पण त्याने देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…
शोध होतं तो एकच गोष्टीचा…पण ती देखील कुठे आहे कोणालाच माहित नव्हती…
आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच’ आपल्यावर येऊ शकते..

१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…
शिवाजी शिवाजी करत बसणारे आम्ही ….मराठ्यांच्या पूर्ण इतिहासाला शिवाजी पुरताच मर्यादित करून बसलो होतो!
हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर, त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!

बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू आम्हाला माहित होतं…पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार? आपलं सरकार तरी कुठे मान्यता देतं? शिवाजी महाराजांचे समुद्रात पुतळे उभारतील, पण त्यांचे गड किल्ले भाग्नावास्तेत पडू देतील, असलं हे विचित्र सरकार! शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव खरोखर किती मोठा होता हे आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा
‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!

ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!

"जो  गती भयी गजेंद्र की, वही गती  हमरी  आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"

बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदाराखिलाफ बाजीरावाची मदत मागितली. संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते. असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले. बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.

“ उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून उशीर झाला!"

ह्याला म्हणतात मराठी  बाणा! मैत्रीचं राजकारण खेळावं तर ते असं! पोकळ दंडावर फुकटचे षड्डू  थोपटत बसणाऱ्या राजकारण्यांनी आणि सरकारी यंत्रणेने काहीतरी शिकावे ह्यातून!! ह्या कृत्यानंतर बाजीरावाने बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी  फडकला!!

अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय…सगळं अगदी घाईघाईत घडलं…

इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला.. जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली…घोड्यांच्या टापांनी हादरून उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!

बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही बलजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला….आणि नंतर लागल ते एक छोट गाव! हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला! अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही पटाईत! गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये विचारल,

"इधर कोई समाधी है क्या?"

" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?" असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली! कोणालाच माहित नहीं! मग मूळ मुद्द्यावर आलो,

"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?"

रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली…

ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली… गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे…भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम…जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर असावीत! सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील! अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला, सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि आपल्या डेरयात मसलती करीत बसलेला एक दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा हाच तो!

बाजीराव!

गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच  मजबूत विचारशक्ती!

कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा पंतप्रधान! (नाहीतर आजकालचे पंतप्रधान!)

असो!

तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसता सपाट जमीन! डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकी भाजून काढणार ऊन!! आता काय करायच ह्या विचारत असताना एक उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पहु इथे विचारून! भात्यातील शेवटचा बाण उरले तो मारून पाहू! असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!

पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची जाणीव त्या दिवशी झाली!

आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो! आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!

आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणूनदेखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल आपण अपेक्षा ठेवत नहीं! तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!

महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून आम्ही कधीच, "पेशवा बाजीराव की समाधी कहा है? " असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही गोष्ट घडली खरी!

असो!

मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"

"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला! हा माणूस म्हणजे दादासाहब!
नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम बारीक, दाढ़ीची  खुंट वाढलेली आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता!

मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"

आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले, "समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."

पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!

पेशवा सरकार!

पेशवा सरकार!!!

इतका मान! इतका आदर!! ते देखील पुण्याहून शेकडो मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!!

आश्चर्य!

मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या कडा पाणवल्या!

ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे देखील त्याला इतका मान नाही!

महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी "अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न विचारणारे महारथी देखील आहेत!

आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणी ह्या नर्मदेच्या वाळवंटात  उभा असलेला हा गावठी ‘दादासाहब’ कुठे !

मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!

कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं, क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश, पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते! शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पाने आपण नवे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान? कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना इतका आदर करतो!

पेशवा सरकार!! 

ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो!

तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!

परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची, त्याच्या नावाला न साजेशी अशी दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!

बाहेर वाऱ्यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत परत ऐकू येत होते!

पेशवा सरकार!!

पेशवा सरकार!!

- प्रांजल वाघ

१३/०१/२०१२

थोरले बाजीराव पेशवे समाधी स्थळ

थोरले बाजीराव पेशवे समाधी स्थळ


For more photos click here

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share
Share

On the occasion of International Women’s Day I would like to share a beautiful thought by one of Marathi’s great authors – V.P.Kale lovingly known as VaPu by his fans.

This thought signifies, reasserts and reminds us all of the importance & necessity of a woman in a Man’s life.

The thought goes as this:

व.पु. काळे म्हणतात,

"बायको म्हणजे कशी हवी?…

आपण बिथरलो तर आपल्याला सावरणारी हवी ,

स्वतःच बिथरणारी नको,

थोडक्यात म्हणजे पेपर वेट सारखी हवी,

खालचे कागद फडफडतील पण ती स्वतः गडगडणार नाही,

चळणार नाही,

नी खालचे कागदही उडू देणार नाही."

 

The English translation is:

VaPu Kale says:

“How should a wife be?…

If we get disturbed, she should stand firm and support us,

Not herself be disturbed.

In short, she should be like a Paperweight

Even if the papers beneath are ruffled by the winds,

She should not be affected by the wind, not even shake

She should be so strong that neither should she flutter in the wind

Nor should she let the papers underneath blow away!”

 

Happy Women’s Day :D

 

Cheers,

Pranjal A Wagh

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share
Share

 

आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे
की माझ्या मनात काहुर माजलाय?
काही कळेना मला…

Pic 173
हा गडगडाट होतोय
की छाती मध्ये धडधडतय?
काही कळेना मला…

वारा सुटलाय बेभान
की माझ मन वाहवत चाललय?
काही कळेना मला…

मेघातून पाणी पडतय
की आसवांचा पाउस कोसळतोय?
काहीच कस कळेना मला..

DSCN0046

ढग भेदून एक किरण आला
की मनात आशेचे अंकुर फुटले?
थोडस समजू लागलय…

धुरकट धुक नाहीस होतय
आणि नव्या वाटा दिसू लागताहेत
थोड स्पष्ट दिसू लागलय खर…

DSCN0074 

प्रत्येक फूल हसतय
आणि माझी कळी देखील खुलली 
   मनात प्रकाश पडू लागलाय माझ्या…

 
Copyright © Pranjal A. Wagh

प्रत्येक काळ्या रात्रीनंतर
एक तेजस्वी सकाळ येते
हे आता लक्षात आलय माझ्या!

 

- प्रांजल वाघ
१८ जून २०१०

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share
Share

Sarjekot सर्जेकोट

*****
सर्जेकोट हा अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा शेजारी. खरे तर हा कोट नव्हे एक मोठा बुरूजच आहे. कित्येकदा सर्जेकोटाला कुलाब्याचा अठरावा बुरूज म्हटले जाते!
हा सर्जेकोट बांधला गेला तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. त्याला कुलाब्यचा अंगरक्षक म्हटल तरी चालेल. तर असा हा सर्जेकोट, ह्याच्या भक्कम भिंती आजही शाबूत आहेत. दरवाजा तेवढा नाही आहे.
*****

महाराष्ट्र दिना निमित्त मी एकटाच निघालो फिरायला. मी ट्रेकिंग करतो ते मज्जा मारण्यासाठी नव्हे. मी गड पाहायला जातो. त्यामुळेच मला लोकांना सांभाळत बसायला आवडत नाही. मी काहीसा एकटा असण्यात आणि ह्या किल्ल्यांच्या सहवासात हरवून जाण्यात आनंद मानतो. मला इथला इतिहास मग जाणून घेता येतो आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गड बारकाईने पाहता येतो. त्याचा अभ्यास करता येतो!

Kulaba from Alibag

कुलाबा किल्ला, अलीबाग वरून.

जेव्हा मे अलिबागच्या किनार्‍याला पोहोचलो तेव्हा ओहोटी लागलेली होती. त्यामुळे कुलाबा हा भुईकोट झाला होता. कुलाब्यचा अगदी बाजूलाच उभा आहे तो सर्जेकोट. आपल्या मोठ्या भावाला सार श्रेय देऊन निवांत उभा.

लोकांचा ओघ होता तो कुलाब्याच्या दिशेने. सर्जेकोटाकडे कुणी ढुन्कून देखील पाहत नव्हत! आणि ही मंडळी कुलाब्यावर करत काय होती? एकमेकांचे फोटो काढणे, गप्पा मारणे ह्यात रममाण. करा ना गंमत, काढा ना फोटो, मी कुठे नाही म्हणतोय? पण इतिहासाची काही जाण? का सत्य माहीत नसेल तर खुशाल काहीच्या काही फेकायच? आणि सगळ्या थापा मारुन पुढे एक शिवाजीच नाव लावला की ते सत्य होत?

असो.

मे जेव्हा तिथल्या एका माणसाला विचारल, की बाबा, सर्जेकोटवर जाता येत का? तिकडे कुणी जात की नाही? तर तो म्हणाला की तिथे जाता येत पण तिथे फक्त एक विहीर असल्यामुळे तिथे कोणीच जात नाहीत! ही तर माझ्या साठी एक मेजवानीच होती जणू! संपूर्ण सर्जेकोट माझीच जणू वाट पाहत उभा होता!

Sarjekot from Kulaba

सर्जेकोट, कुलब्याहून!

माझा कुलाबा पाहून झाल्यावर जणू कुणी हाक मारुन बोलवल्यासारखी पावल आपोआप सर्जेकोटाच्या वाटेवर पडली. कुलाबा आणि सर्जेकोट, ह्या मध्ये एक दगडी सेतू आहे. तो सेतू ओलांडून मे सर्जेकोटाच्या द्वाराकडे निघालो.

Doorway of Sarjekot

सरेजोकोटाच पडलेल दार.

सर्जेकोटाच द्वार कधीच पडून गेल आहे. त्याचे भक्कम बुरूज मात्र तसेच उभे आहेत. असंख्य लाटांचा मारा थोप्वित! सर्जेकोटमध्ये प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम नजरेस पाडते ती एक विहीर आणि त्यावर उगवलेल एक सुंदर फुलांनी सजेलल चाफ्याच झाड.

Wild Chaafa Dried up well

झाडावर सुंदर चाफा आणि विहिरीत गाळ!

झाडाला फुला खूप आहेत न सुंदर आहेत पण विहिरीत पाणी कमी आणि गाळ जास्त आहे. शेजारीच तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. पायर्‍या मात्र अगदी सुस्थितीत! Steps in excellent condition

अत्यन्त सुंदर आशा पाय्र्या!

मी तटावर चढलो आणि सार पाहून घेतल. उत्तरेस खान्देरि-उन्देरी ही जोडी पहिली.सार झाल्यावर मी आलो आणि तटावर बसलो. त्या उष्ण वातावरणात देखील एक थंड हवेची झुळुक आली आणि मन सुखावून गेली.

The round fortifications of Sarjekot

सर्जेकोटाचा तट

लहानपणी एक गोष्ट वाचलेली, ती आठवली. गोष्ट अशी होती की एका रिकाम्या गढीचा ताबा घ्यायला एका शिपायाला पाठवल जात. त्याला एकट्याला पाठवतात कारण शत्रू त्या गढीवर चालून येईल अशी मुळीच अपेक्षा नसते, तो शिपाई तेथे पोहोचतो खरा पण शत्रू चालून येत असल्याचे त्याला कळते.

जराही विलंब न करता तो लगेच गढीचा दरवाजा लावून घेतो आणि शत्रू जवळ येताच त्यावर बंदुकींचा मारा करतो. एका बंदुकीचा बार उडवून लगेच धावत जौन दुसरी बंदुक उडवण अस तो करतो आणि शत्रूला अस भासवतो गढीवर भरपूर सैनिक आहेत. शेवटी तो थकतो आणि गढी शत्रूच्या स्वाधीन करतो तेव्हा कुठे शत्रूच्या ध्यानात खरी गोष्ट येते.

माझ अगदी तसच झाल! गडावर मी एकटाच. बसल्या बसल्या मनाला एक विचार चाटून गेला. कधी ना कधी कान्होजी आंग्रे स्वतः ह्या तटावर आले असतील.ह्याच मातीमध्ये त्यांची पावले पडली असतील! इथली धूळ पवित्र झाली असेल! तटावरून आपली जाणती नजर त्यांनी फेकली असेल. सभोवतलीचा परिसर न्याहळला असेल. गडातील अधिकार्‍यांना सूचना केल्या असतील….अंगावर कसा रोमांच उभा राहिला!

आज इथे फक्त मीच होतो. कुलाब्याला येणार्‍या एकाही व्यक्तीला इथे यावेसे वाटत नव्हते. इथे गडकरी मी, शिपाई मी, गोलंदाज मी, सार सार काही मीच! जणू काही सर्जेकोटाचा राजाच झालो मी! आज जर सर्जेकोटावर कोण चाल करून आल तर तो दरवाजा लढवण्याची शर्थ मीच छातीचा कोट करून केली असती! आणखी कोण होत तिकडे?

म्हटल, “अरे सर्जा, तू एकटा. तुला सार जग विसरून गेल, कोणाच्या ध्यानात देखील तू नाहीस. मी देखील एकटाच आलो आहे तुला भेटायला. तू एकटा आणि मी देखील एकटाच! सार जग आपल्याला विसरून गेलय. तुझ्या ह्या दगडी अस्तित्वात काय रहस्य दड्ली आहेत कुणास ठाऊक? कधी ते कुणाला कळणार देखील नाही! माझ्यासारखा एखादाच वेडा असेल जो तुला भेट देईल! आजतू माझा गड न मे तुझा गडकरी! राजाच जणू एका दिवसाचा!”

-प्रांजल वाघ

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share
Share

*************
Marathi Saunskruti Sangraha or MSS, a venture of which I am proud of being a part launched its website on 1st May 2009 that is on the auspicious ocassion of Maharashtra Day. The sentiments and the reason behind the foundation of MSS and the website is what Ojus Narawane attempts to tell you through this article!

Visit the website and do give us the feedback!!
*************

मराठी संस्कृती संग्रह
लाभले आम्हास भाग्य बोलतो आम्ही मराठी!

Namaskar Mandali :) ,

We are extremely delighted to announce the release of our website, MarathiSS.com; that’s right, we have our own home on the web now. It also gives us great pleasure to tell you that we are particularly lucky to have Maharashtra Day as the auspicious day of our site release :) .

After going through the Vision and Mission, you must have recognized the reason we are pushing for more and more text being written in English script, but of course in Marathi Language. This site chiefly aims to promote other Marathi Sites, which beautifully capture the essence of the rich and varied Marathi culture.

I felt there was a need to have something that provides a snapshot, as well as a doorway to the Marathi Culture online, especially for people like me … an average Marathi youth disconnected in many ways from Marathi Culture, yet proud of being Marathi, based on whatever knowledge I have about Marathi culture :) . I felt that a website, especially something like File hippo, a directory that would point to all interesting sites grouped into various categories would serve the purpose.

So, thus began my discussion regarding the site, with Harshad, who is an expert when it comes to knowledge about Marathi culture. Having grown up in the Culture capital of Maharashtra, Harshad is, especially very well acquainted with anything that is related to Marathi Food, Theatre and Music ;) . Ok, after brainstorming for a few weeks we had a few plans in mind now, but then who was going to put them up online in a proficient way, so that people actually felt like visiting the site again and again ;) . The answer obviously was, Amey. Amey is an expert when it comes to web designing and related technologies. The entire site’s beauty is attributed to none other than him.

So thus began the journey of MSS…

After facing few restrictions in terms of creativity at the wiki dot site, we decided to buy our very own domain, and marathiss.com sounded so perfect and beautiful ;) . And thus began the process of collecting interesting Marathi sites and grouping them in their relevant categories. We also have a forum which serves as a platform for members to discuss anything regarding Marathi culture. Just recently, Pranjal has joined the MSS team. We now have a professional blogger and experienced trekker with us to give a boost to MSS .

You can consider this site as hobby work done by four youngsters who are passionate about Marathi culture. We feel there needs to be greater representation of budding Marathi Culture talent and entrepreneurship on the World Wide Web as well as the real world. This idea was basically born after facing certain situations in the very capital of Maharashtra. To be precise, we usually have had situations where we have gone to the extent of organising weekend food trips to cities like Pune, cause there is a severe non availability of Marathi Food when it comes to places like Mumbai and Navi Mumbai. This is perhaps because Maharashtrians are not that enterprising or business minded as compared to other communities of India :) . Which is why it’s sometimes sad to see an extremely rich and varied culture not receiving the appreciation and visibility it deserves. Through this site, we wish to promote Marathi Culture in our very own small way and also appeal to people to be a little more enterprising when it comes to publicising and promoting a product, an item ,a foodstuff or a bit of Marathi culture, however small or tiny it maybe. Just like Vada pav, Pav Bhaji, Misal Pav, Veg Kolhapuri are popular, wouldn’t it be nice to see Sabudanyachi Khichadi, Thalipeeth, PuranPoli, Varan Bhat, Piyush or Basundi or even Faral items listed in a regular restaurant menu along with the regular North Indian and South Indian cuisine? There are many small specialities which are linked to specific regions of Maharashtra like Konkan, Varad, Marathwada and their availability is limited to that region only. Kai Majja yete when naatevaikankade gelyavar kadhi Kokanatali fish curry khayala milate, kiva Varadaat ani Kolhapurat jaun masta tikhat jevan and thecha milato. It would be even nicer to see ashya chotya mothya goshti commercialised and documented on the World Wide Web before the knowledge base is lost in the coming years. The best way to start this is, I feel, through the medium of the internet, which is the first choice of seeking information for the present generation … I mean, wouldn’t it be nice to see a greater representation of Marathi Culture in a Bollywood Film, when it’s possible to have every alternative song in Bollywood, in Punjabi :) ; or isn’t it high time we have a entry about Music Directors like Ajay Atul featured in Wikipedia? By stating this example in a blog entry, we are basically trying to explain our feelings behind having such a site online. In fact there are many aspects to this, which can be discussed here, not restricted to Food, Movies and Music alone. We don’t mean to show disrespect for any culture or demean anyone; we have tremendous respect for cultures of all other states and regions and also for their peopleJ. It’s only that, we are simply fans of Maharashtra, its Culture and its simple and loving people, just the way you are, and are very happy to be involved with a project that will promote ‘Aapala Marathmola Culture’ in our own special way :) .

We encourage well wishers to support the site if they like what we are doing. Our aim is not content creation, but to simply promote the already existing or newer content on the web and put it forward to the world, in the form of a Sangraha. Great efforts have been taken by the members of The MSS Team to gather information about sites which can be listed, but I am sure you too have a lot more suggestions regarding interesting sites which can be added in the Sangraha. So, do get your sites, personal WebPages, Picasa albums and blogs and help us promote you in our own small way. We have even made a forum for you to have discussions with likeminded individuals in your area of interestJ. Your comments and suggestions and praises and even curses are most valuable and will only help us improve. Do report dead links, incorrect classifications or any other mistakes from our side. We will try to rectify the errors as soon as possible. Finally, we would like the Sangraha to grow and take the shape of something like a Google or Yahoo online web directory…

Hope you have a wonderful experience throughout your time spent at MarathiSS.com :) .

Regards,
Ojus Narawane
Team MSS

Share
Share

This article was written by me for www.marathimati.com and can be viewed here


महाराष्ट्र
….
या नावातच सारं काही आलं!
महा राष्ट्र!
या राष्ट्रात विवधता अगदी ठासून भरलेली आहे!
इतिहास, निसर्ग, कला, साहित्य, पाककला ह्या सगळ्यात इतकं वैविध्य क्वचितच जगात आढळेल!

ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का?
जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा संभाजी नावाच्या एका ‘पोराने’ पहिली नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले!

पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या दिल्लिचं तख्त काबिज़ करून ह्या महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही ताकत आहे इथल्या मंगटातली!

जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण!
इथला कोंकण किनारा,इथला समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्ये…
इथली वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली आहे! इथली फळ ही जगप्रसिद्ध आहेत! सार्‍या दुनियेला वेड लावणारा फळांचा राजा हापूस आंबा देखील महाराष्ट्राचाच!

हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे! ह्या मातीला कलादेवतेच वरदान आहे! सतार इथेच जन्माला आली! वारली कला, बिद्रि कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला हे सारे प्रसिद्ध तर आहेतच पण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग हा अगदी पूर्वापार चालत आलेला आहे! पैठणी, नारायणी पेठ ह्या साड्या म्हणजे इथली शान आहेत!
इथली झणझणीत लावणी, खडे पोवाडे, कोळी गीत, भारुड हे सर्वांना भुरळ घालतात! इथली रंगभूमी, इथली नाट्यगीत सारी जगावेगळी!
भारतातील पहिला चित्रपट देखील ह्याच भूमीत तयार झाला!
अशी आहे महाराष्ट्राची कला परंपरा!

मराठी साहित्या म्हणजे रत्न-हिरे ह्यानी खचून भरलेली खाण आहे.
पु.ल. देशपांडे,कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी ही ह्या खाणीमधली काही रत्ने!
विनोदी, ऐतिहासिक, विडंबनात्मक …. जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील!
700 पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेली ही आमची मायबोली ह्या प्रचंड साहित्य परिवाराने आणखीच खुलते!

महाराष्ट्रीय जेवण म्हणजे तर स्वर्गाहून सुंदर!
इथली पुरणपोळी, थालीपीठ, चकली ,चिवडा, श्रीखंड सगळ्यांना तौक आहे पण इथल्या प्रत्येक शहराला आपली एक पाक संस्कृती लाभलेली आहे.
मुंबईचा वडा पाव,नागपूरच्या सावजी समुदायाचे तिखट जेवण,वडे-भात, कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा,मिसळ, सातारी क्न्दी पेढे, पुणेरी मिसळ, कोंकणी आआणी मालवणी जेवण….अहाहा! पाणी सुटल तोंडाला! हे तर फक्त मोजके नमुने आहेत!

तर असा आहे आमचा महाराष्ट्र! कणखर आणि राकट तरी सार्‍याणा माया लावणारा आणि जपणारा!

प्रांजल वाघ

Creative Commons License
This work by
Pranjal A. Wagh
is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Share
Share

Shivaji is the Tiger………..Excerpts from The ShivarajBhushan by MahaKavi Bhushan Tripathi

The ShivarajBhushan (The Ornament of Shivaji) by Mahakavi Bhushan Tripathi is a of nearly four hundred Brijbhasha poems written at the court of Shivaji Maharaj.This composition was made circa 1673 and with Shivaji’s ascent to the throne in 1674 makes it extremely likely that ShivarajBhushan was composed for the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj.

The following poem is but a part of this splendid composition. It touches upon all the virtues of the great warrior and rightly compares Shivaji Maharaj with the Gods.

This poem is currently a part of the Title track of the Grand Marathi Serial, Raja ShivChhatrapati, which is aired on Star Pravaah every Monday-Friday at 08:30pm. Check out the poem, its meaning and then watch the video and read the poem alongwith the song. If you do not get an adrenaline rush…..talk to me then!

Here is the poem:

इन्द्र जिमि जृम्भा पर

बाडव सअंभ पर

रावण सदंभ पर

रघुकुल राज है !

पवन बारिबाह पर

संभु रतिनाह पर

ज्यों सहसबाह पर

राम द्विजराज हैं !

दावा दृमदंड पर

चीता मृगझुन्द पर

भूषण वितुण्ड पर

जैसे मृगराज हैं !

तेज तमअंस पर

कन्ह जिमि कंस पर

त्यों म्लेंच्छ बंस पर

शेर शिवराज हैं!!!!!!!!!!!

-
महाकवि भूषण

Literal Translation and Meaning:

I have tried my level best to translate and decipher the meaning this piece of poetry. If any errors are found please do forgive me. Point out the errors and I will correct them faster than the speed of sound. Here goes:

Stanza 1:

Translation:

Like Lord Indra against the Demons Like Vamana against against King Bali Like the King Ram of the Raghu clan against the Lord Ravana of Lanka

Meaning:
(Shivaji Maharaj is:) Like Lord Indra who defeated the evil forces of the demons. Like small Vamana who was an avtaar of Lord Vishnu, defeated the mighty Asur King Bali by just asking cleverly for alms while the Yagna was on.

{The story is that Bali, the grandson of King Prahlada was a very valorous and mighty asura . By his penance and might, he conquered the whole world. Indra and other gods fearing that he and asuras would conquer all the three worlds, went to Lord Vishnu for help. Lord Vishnu was then born as a dwarf Vamana in the household of a Brahmana. He went to Bali on growing up and asked for alms during a yagna.

Bali was delighted to offer him anything he requested even though his priest warned him that it was Lord Vishnu.Vamana then requested for the amount of land that could come under three of his steps. Bali gracefully agreed. Lord Vishnu then grew in size and covered the earth and heaven in two stride. And due to lack of space, he put his third step on Bali himself and crushed Bali to the nether or the Patala loka(underground world), thus helping the Gods out.}

(Shivaji Maharaj is:) Like the King Ram great Raghu Dynasty who defeated the mighty forces of Lord Ravana of Lanka with the help of an army of monkeys!

Stanza 2:

Translation:

Like Lord Shiva against Rati’s Husband, Kama Like Parshurama, the lord of Brahmanas, against Sahasrabahu

Meaning:

(Shivaji Maharaj is:) Like Lord Shiva who slew Rati’s husband,Kama,the lord of desire by opening his Third Eye and burning him to ashes!
(Thus implies Kavi Bhushan, that it is Shivaji who will burn down the evil Mughals and Adilshah to ashes!)
Like Lord Parshurama, the sixth avatar of Vishnu, who was the saviour of defeated the Haihaya King Kartavirya Arjuna also called as Sahasrabahu or Sahasrarjuna, as he had a thousand hands.

{Parshurama was the son of Sage Jamadagni and Renuka.Parshurama was so called as his favourite weapon was a Parashu (axe). Legend has it that King KartaVirya Arjuna was drunk with power and used to trouble the brahmanas by stealing away their cattle, disturbing their pennances and their yagnas. Once, The king KartaVirya Arjuna visited Jamadagni’s ashram with his army. Jamadagni welcomed and fed the king and his army with the help of his cow, Kamadhenu. The king was amazed and asked Jamadagni for the cow. Jamadagni refused to yield as he would need the cow for religious practices. Angered, Arjuna destroyed the ashram and took away the cow forcibly. When Parshurama came to know about this, he killed the entire army of the king and then killed the King himself by cutting of each of the King’s arms by using his axe. The King’s sons retaliated and killed Jamadagni while he was meditating. When Parshurama returned and found his mother crying he asked her the reason for her sorrow. His mother did not reply but beat her chest 21 times. Angered, Parshurama vowed that he would take revenge upon the Haihayas 21 times. He killed all the sons of Arjuna and killed all the Haihaya-Kshatriyas of the world 21 times. Thus he conquered the whole earth and donated it to the brahmanas. Thus he ended the arrogance of Kshatriyas.}

Stanza 3:

Translation:

Like Fire which burns wood, Like a Cheetah against a herd of deer, Says Bhushana, (He is )Like a Lion against Hogs.

Meaning:

(Shivaji Maharaj is :) Like the fire which burns wood, he is swift and deadly like the Cheetah against a herd of deer. Kavi Bhushan says, (Shivaji is) like a lion against wild hogs.
Stanza 4:
Translation:
Like a ray of light through the darkness,
Like the Child Krishna against Kansa, Has descended upon the clan of Mlecchas(Mughals and Adilshah) Shivaji, the Tiger!

Meaning:

(Shivaji Maharaj is:)
Like a ray of light that shatters the darkness and he offers hope to millions of people oppressed by the cruel rule of Aurangzeb across India.
(He is) like the child Krishna who defeated his maternal uncle, Kansa in wrestling and killed him.
( This great warrior) has now descended upon the clan of Mlecchas, (Here the poet refers to Mughals and Adilshah who oppressed their Hindu subjects and tortured them in many cases. Although Shivaji Maharaj’s kingdom was a Hindu State, he never forced religion on anyone. His was a state which practiced religious tolerance.) like a Tiger!

Here is the video of the title track of Raja ShivChhatrapati. Now try to recite the poem along with the title track and you will get the adrenaline rush!
The Link:

RajaShivChhatrapati Title Track
http://www.youtube.com/watch?v=gpuzZGOAesY

Note:
The word Mleccha directly means a Muslim. Though the Poet has used the word in his work to portray the cruel tactics of the Muslim Rulers Aurangzeb and Adilshah and although Shivaji Maharaj established his kingdom to free the oppressed Hindu subjects from the tyranny of these two Muslim states, Shivaji never was against Muslim religion (and neither am I!). He was against the atrocities of Aurangzeb and Adilshah. Hence, I believe using the word Mleccha to denote a Muslim would be demeaning. Hence, I have not used Muslim as the literal translation for Mleccha but have used Mughals and Adilshah.

Let it be known to all those Hindu hardliners and the so-called Hindu fanatics that Shivaji Maharaj practiced, religious tolerance in his kingdom. He deeply respected Muslim religion and never demolished any Muslim place of worship.

On the contrary, his army had 1/3th part of it as Muslims. His navy had Ibrahim Khan and Maynaak Bhandari as the chiefs. He deeply respected and often sought blessings from Sufi saints like Baba Sharifuddin and also of Shaikh Yakub of Konkan.He called Hazrat Baba of Ratnagiri bahut thorwale bhau, meaning “great elder brother”.

PS: Special thanks for this poem to my friend Tejas Thatte.Thanks, Chiknya!

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

Share
Share

Friends, Indians, Countrymen, Lend me your eyes! This one is a different venture from me! For the first time I am going to publish someone else’s work on my blog! This one’s a short poem written by Marathi Singer/Musician Avadhoot Gupte for the Purepur Kolhapur (पुरेपुर कोल्हापूर). It is found written on their Menu Cards and I must say it takes you right into Kolhapur! It doesn’t matter whether you have been to Kolhapur this poem will give you a feel that you are standing in Kolhapur while you read it. It made me nostalgic as I have been to Kolhapur and enjoyed the sights over there. Being a food crazy person and non-veg fanatic Kolhapur is like a seventh heaven for my taste buds (and me too!). This poem has made me nostalgic about Kolhapur. Read on and do make sure to inform me how you liked it via your comments!

PS:

  • I was told by one of my friends that Avadhoot Gupte has written this poem but If anyone has confirmation about the poet, please do inform me about it!
  • The credit for forwarding this poem to me goes to my friend, Ms.Latika Panjabi (No, She’s not from Slumdog!).Thanks for the poem!

Here goes……. भावा, नाद नाय करायचा!!

Share