जगण्याच्या वाटेवरती,पदोपदी पसरली आगआशेच्या शिखरावर बसला,नैराश्याचा विषारी नाग! क्षितिजावर दाटल्या ढगांना,भेदून येतो प्रकाश!पडती खिंडारे त्या भिंतीस,मोकळे होत जाते आकाश! त्या निळ्या आभाळात मजला,होतो तव नयनांचा भास,अन् मग हरलेल्या लढाईला होतेविजयाची आरास! – प्रांजल © 31 Aug 2013 …