Provera Birth Control Pill Buy Viagra At Walgreens Kamagra Buy Over Counter Levitra Cialis Viagra Online Reglan For Sale
A Rational Mind

सर्जेकोटाचा राजा!

Sarjekot सर्जेकोट

*****
सर्जेकोट हा अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा शेजारी. खरे तर हा कोट नव्हे एक मोठा बुरूजच आहे. कित्येकदा सर्जेकोटाला कुलाब्याचा अठरावा बुरूज म्हटले जाते!
हा सर्जेकोट बांधला गेला तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. त्याला कुलाब्यचा अंगरक्षक म्हटल तरी चालेल. तर असा हा सर्जेकोट, ह्याच्या भक्कम भिंती आजही शाबूत आहेत. दरवाजा तेवढा नाही आहे.
*****

महाराष्ट्र दिना निमित्त मी एकटाच निघालो फिरायला. मी ट्रेकिंग करतो ते मज्जा मारण्यासाठी नव्हे. मी गड पाहायला जातो. त्यामुळेच मला लोकांना सांभाळत बसायला आवडत नाही. मी काहीसा एकटा असण्यात आणि ह्या किल्ल्यांच्या सहवासात हरवून जाण्यात आनंद मानतो. मला इथला इतिहास मग जाणून घेता येतो आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गड बारकाईने पाहता येतो. त्याचा अभ्यास करता येतो!

Kulaba from Alibag

कुलाबा किल्ला, अलीबाग वरून.

जेव्हा मे अलिबागच्या किनार्‍याला पोहोचलो तेव्हा ओहोटी लागलेली होती. त्यामुळे कुलाबा हा भुईकोट झाला होता. कुलाब्यचा अगदी बाजूलाच उभा आहे तो सर्जेकोट. आपल्या मोठ्या भावाला सार श्रेय देऊन निवांत उभा.

लोकांचा ओघ होता तो कुलाब्याच्या दिशेने. सर्जेकोटाकडे कुणी ढुन्कून देखील पाहत नव्हत! आणि ही मंडळी कुलाब्यावर करत काय होती? एकमेकांचे फोटो काढणे, गप्पा मारणे ह्यात रममाण. करा ना गंमत, काढा ना फोटो, मी कुठे नाही म्हणतोय? पण इतिहासाची काही जाण? का सत्य माहीत नसेल तर खुशाल काहीच्या काही फेकायच? आणि सगळ्या थापा मारुन पुढे एक शिवाजीच नाव लावला की ते सत्य होत?

असो.

मे जेव्हा तिथल्या एका माणसाला विचारल, की बाबा, सर्जेकोटवर जाता येत का? तिकडे कुणी जात की नाही? तर तो म्हणाला की तिथे जाता येत पण तिथे फक्त एक विहीर असल्यामुळे तिथे कोणीच जात नाहीत! ही तर माझ्या साठी एक मेजवानीच होती जणू! संपूर्ण सर्जेकोट माझीच जणू वाट पाहत उभा होता!

Sarjekot from Kulaba

सर्जेकोट, कुलब्याहून!

माझा कुलाबा पाहून झाल्यावर जणू कुणी हाक मारुन बोलवल्यासारखी पावल आपोआप सर्जेकोटाच्या वाटेवर पडली. कुलाबा आणि सर्जेकोट, ह्या मध्ये एक दगडी सेतू आहे. तो सेतू ओलांडून मे सर्जेकोटाच्या द्वाराकडे निघालो.

Doorway of Sarjekot

सरेजोकोटाच पडलेल दार.

सर्जेकोटाच द्वार कधीच पडून गेल आहे. त्याचे भक्कम बुरूज मात्र तसेच उभे आहेत. असंख्य लाटांचा मारा थोप्वित! सर्जेकोटमध्ये प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम नजरेस पाडते ती एक विहीर आणि त्यावर उगवलेल एक सुंदर फुलांनी सजेलल चाफ्याच झाड.

Wild Chaafa Dried up well

झाडावर सुंदर चाफा आणि विहिरीत गाळ!

झाडाला फुला खूप आहेत न सुंदर आहेत पण विहिरीत पाणी कमी आणि गाळ जास्त आहे. शेजारीच तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. पायर्‍या मात्र अगदी सुस्थितीत! Steps in excellent condition

अत्यन्त सुंदर आशा पाय्र्या!

मी तटावर चढलो आणि सार पाहून घेतल. उत्तरेस खान्देरि-उन्देरी ही जोडी पहिली.सार झाल्यावर मी आलो आणि तटावर बसलो. त्या उष्ण वातावरणात देखील एक थंड हवेची झुळुक आली आणि मन सुखावून गेली.

The round fortifications of Sarjekot

सर्जेकोटाचा तट

लहानपणी एक गोष्ट वाचलेली, ती आठवली. गोष्ट अशी होती की एका रिकाम्या गढीचा ताबा घ्यायला एका शिपायाला पाठवल जात. त्याला एकट्याला पाठवतात कारण शत्रू त्या गढीवर चालून येईल अशी मुळीच अपेक्षा नसते, तो शिपाई तेथे पोहोचतो खरा पण शत्रू चालून येत असल्याचे त्याला कळते.

जराही विलंब न करता तो लगेच गढीचा दरवाजा लावून घेतो आणि शत्रू जवळ येताच त्यावर बंदुकींचा मारा करतो. एका बंदुकीचा बार उडवून लगेच धावत जौन दुसरी बंदुक उडवण अस तो करतो आणि शत्रूला अस भासवतो गढीवर भरपूर सैनिक आहेत. शेवटी तो थकतो आणि गढी शत्रूच्या स्वाधीन करतो तेव्हा कुठे शत्रूच्या ध्यानात खरी गोष्ट येते.

माझ अगदी तसच झाल! गडावर मी एकटाच. बसल्या बसल्या मनाला एक विचार चाटून गेला. कधी ना कधी कान्होजी आंग्रे स्वतः ह्या तटावर आले असतील.ह्याच मातीमध्ये त्यांची पावले पडली असतील! इथली धूळ पवित्र झाली असेल! तटावरून आपली जाणती नजर त्यांनी फेकली असेल. सभोवतलीचा परिसर न्याहळला असेल. गडातील अधिकार्‍यांना सूचना केल्या असतील….अंगावर कसा रोमांच उभा राहिला!

आज इथे फक्त मीच होतो. कुलाब्याला येणार्‍या एकाही व्यक्तीला इथे यावेसे वाटत नव्हते. इथे गडकरी मी, शिपाई मी, गोलंदाज मी, सार सार काही मीच! जणू काही सर्जेकोटाचा राजाच झालो मी! आज जर सर्जेकोटावर कोण चाल करून आल तर तो दरवाजा लढवण्याची शर्थ मीच छातीचा कोट करून केली असती! आणखी कोण होत तिकडे?

म्हटल, “अरे सर्जा, तू एकटा. तुला सार जग विसरून गेल, कोणाच्या ध्यानात देखील तू नाहीस. मी देखील एकटाच आलो आहे तुला भेटायला. तू एकटा आणि मी देखील एकटाच! सार जग आपल्याला विसरून गेलय. तुझ्या ह्या दगडी अस्तित्वात काय रहस्य दड्ली आहेत कुणास ठाऊक? कधी ते कुणाला कळणार देखील नाही! माझ्यासारखा एखादाच वेडा असेल जो तुला भेट देईल! आजतू माझा गड न मे तुझा गडकरी! राजाच जणू एका दिवसाचा!”

-प्रांजल वाघ

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.