A Rational Mind

आठवणींचा पाऊस…

 

आज अचानक घरी जाता जाता,

भरून आलेलं आभाळ फाटलं,

सरीवर सारी बरसू लागल्या,

आणि मनाला एकच वाटलं!

 

मला हवं तेव्हाच पाऊस पडावा,

मी सांगितलं, "जा!", की तो निघून जावा ,

पण असं पाऊस कुणाचं ऐकतो का?

जा म्हटलं की जातो का?

 

पाऊस येतो तो एकटा येत नाही,

तुझ्या आठवणी तो सोबत घेऊन येतो ,

जुन्या आठवणीत मी हरवून जाताच ,

माझे अश्रू हा पाऊस समावून घेतो !

 

पण ह्या पावसाचा जोर काही वेळापुरताच असतो,

थोड्याच वेळात सूर्य आकाशात हसतो,

पण तुझ्या आठवणींच असं थोडंच आहे?

पाऊस गेला तरी मी तुझ्यातच हरवून बसतो…

Picture Credit: Sambhaji Chopdekar

 

– प्रांजल वाघ

०२ जुलै २०१२

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.